IND vs SA – शुभमन गिल चौथ्या टी-20 सामन्यातून बाहेर; संजू सॅमसनला संधी मिळणार?

टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये चौथा टी-20 सामना लखनौ येथील एकाना क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाणार आहे. सामना सुरू होण्यापूर्वी मोठी माहिती समोर आली असून टीम इंडियाचा उपकर्णधार शुभमन गिलला या सामन्यातून वगळण्यात आलं आहे. दुखापतीमुळे त्याला विश्रांती देण्यात आली आहे.

टीम इंडियाने पाच सामन्यांच्या या टी-20 मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे याही सामन्यात विजय मिळवून मालिका जिंकण्याच्या उद्देशाने संघ मैदानात उतरेल. शुभमन गिलच्या जागी कोणत्या संजू सॅसनला संधी मिळणार का? हे पाहण्यासाठी चाहतेही उत्सुक आहेत. आतापर्यंत शुभमन गिल तीन सामन्यांमध्ये सलामीला आला, परंतू त्याच्या बॅटमधून धावा आल्या नाहीत. पहिल्या सामन्यात अवघ्या 4 धावांवर तो बाद झाला. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात त्याला भोपळाही फोडता आला नाही. तिसऱ्या सामन्यात त्याची गाडी 28 धावांपर्यंत पोहोचू शकली. त्यामुळे बरीच टीकाही झाली. दरम्यान, स्टेडियममध्ये धुकं पसरल्यामुळे नाणेफेक होऊ शकलेली नाही. त्यामुळे सामना उशीराने सुरू होण्याची शक्यता आहे.