
हिंदुस्थान आणि रशिया फेब्रुवारी 2026 मध्ये हिंद महासागरातील बंगालच्या उपसागरात इंद्रा संयुक्त नौदल सराव करणार आहेत, अशी रशियाच्या टीएएसएस एजन्सीने माहिती दिली आहे. रशियन नौदलाचा पॅसिफिक फ्लीट ‘फ्रिगेट मार्शल शापोश्निकोव्ह’ मिलन-2026 सरावात भाग घेईल, त्यानंतर 18 ते 25 फेब्रुवारीपर्यंत विशाखापट्टणम बंदराला अनौपचारिक भेट देईल, असे सांगितले. या वर्षी आंतरराष्ट्रीय नौदल फ्लीट रिह्यू मिलनचे आयोजन हिंदुस्थानात 15 ते 25 फेब्रुवारीपर्यंत होत आहे. 55 हून अधिक देशांची नौदले मिलनमध्ये भाग घेतील, ज्यात अमेरिका, रशिया, जपान आणि ऑस्ट्रेलिया यांचा समावेश असणार आहे.


























































