हिंदुस्थानने दोन हजार बांगलादेशी घुसखोरांना परत पाठवले, BSF ची मोठी कारवाई

हिंदुस्थानने बांगलादेशातून बेकायदा मार्गाने देशात प्रवेश केलेल्या 2000 बांगलादेशी नागरिकांना परत पाठवले आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू झाल्यापासून केंद्राने बेकायदेशीर बांगलादेशी स्थलांतरितांविरुद्धच्या मोहिमेचा भाग म्हणून ही करावी केली असल्याचं बोललं जात आहे. ही कारवाई सीमा सुरक्षा दल (BSF) आणि पश्चिम बंगाल पोलिसांच्या संयुक्त प्रयत्नाने पार पडली. या घुसखोरांना त्रिपुरा आणि पश्चिम बंगालच्या सीमेवरून ताब्यात घेण्यात आले होते.

बीएसएफने दिलेल्या माहितीनुसार माहितीनुसार, हे बांगलादेशी नागरिक बेकायदा मार्गाने हिंदुस्थानात प्रवेश करून पश्चिम बंगालमधील विविध भागांत राहत होते. त्यांच्याकडे कोणतेही वैध कागदपत्रे आढळली नाहीत. या कारवाईदरम्यान, घुसखोरांना ताब्यात घेण्यासाठी बीएसएफ आणि पोलिसांनी संयुक्त गस्त वाढवली होती. तपासात असे समोर आले की, काही घुसखोर मानवी तस्करीच्या रॅकेटद्वारे हिंदुस्थानात आले होते, तर काहींनी बनावट कागदपत्रांचा वापर करून ओळख लपवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र आता त्यांना पुन्हा बांगलादेशात परत पाठवण्यात आलं आहे.