1.70 लाख कोटी जीएसटी कलेक्शन

नोव्हेंबर 2025 मधील जीएसटीच्या कलेक्शनची आकडेवारी समोर आली आहे. या महिन्यात सरकारने जीएसटीमधून 1.70 कोटी रुपयांची कमाई केली आहे. ही कमाई नोव्हेंबर 2024 च्या तुलनेत 0.70 टक्के जास्त आहे. यामध्ये सीजीएसटी 34,843 कोटी, एसजीएसटी 42,522 कोटी आणि आयजीएसटी 46,934 कोटी रुपये आहेत. आयात संबंधित आयजीएसटीमध्ये 10.2 टक्के वाढ झाली असून ही आकडेवारी 45,976 कोटींवर पोहोचली आहे. एप्रिल ते नोव्हेंबर 2025 यादरम्यान एकूण शुद्ध जीएसटी 7.3 टक्के वाढून 12.79 लाख कोटींवर पोहोचला.