
इन्डीडच्या अहवालातील आकडेवारीनुसार हिंदुस्थान आघाडीवर असल्याचे समोर आले आहे. युनायटेड किंगडम, न्यूझीलंड आणि स्वित्झर्लंडसारख्या प्रमुख अर्थव्यवस्थांपेक्षा हिंदुस्थान रोजगार निर्मितीत खूप पुढे आहे. देशात कोविडपूर्व पातळीच्या तुलनेत नोकरीच्या जाहिरातींमध्ये घट झाली असताना हिंदुस्थानातील जॉब पोस्टिंगमध्ये 8.9 टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे.