‘माऊंटन रडार’ ः बॉर्डरवर तिसरा डोळा; सीमेपलीकडील शत्रूंची विमाने, ड्रोनचा धुव्वा उडवणार!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चीन- पाकिस्तानच्या सीमेवर पहारा देण्यासाठी नवीन पहारेकरी तैनात होणार आहे. माऊंटन रडार असे त्याचे नाव आहे. या स्वदेशी रडार्सचा उपयोग कमी उंचीवरून उडणारे ड्रोन्स किंवा इतर अस्त्रे यांना शोधण्यासाठी होणार आहे. शत्रूची विमाने, हेलिकॉप्टर्स, ड्रोन्स, क्षेपणास्त्रे आणि या रडार्सच्या सहाय्याने शोधणे आणि आकाशातच नष्ट करणे शक्य होणार आहे. ‘भारत इलेक्ट्रॉनिक्स’ कंपनीशी माऊंटन रडार खरेदी करण्याविषयीचा करार डीआरडीओने नुकताच केला. हा करार 1950 कोटी रुपयांचा आहे.

माऊंटन रडारमुळे हिंदुस्थानच्या सीमा अधिक सुरक्षित होणार आहेत. डीआरडीओ आणि भारत इलेक्ट्रॉनिक्स यांच्यात मंगळवारी खरेदी करार झाला. दोन अत्याधुनिक माऊंटन रडार, त्यासंबंधित उपकरणे आणि आवश्यक पायाभूत यंत्रणा यांचा करारामध्ये समावेश आहे.

स्वदेशी माऊंटन रडारची वैशिष्ट्ये

  • या रडार सिस्टीमची खासियत म्हणजे ती पूर्णपणे हिंदुस्थानात डिझाईन आणि डेव्हलप केलेली आहे.
  • डोंगराळ आणि दुर्गम भागांमध्ये पहारा देणे ही सुरक्षा दलांसाठी मोठी आव्हानात्मक बाब असते. या भागांमध्ये शत्रूच्या हालचाली टिपणे सोपे नसते. मात्र आता माऊंटन रडारमुळे ही बाब सोपी होईल.
  • उंच डोंगर, प्रतिकूल हवामानात रडार उत्तर कामगिरी बजावेल असा दावा केला जातोय.
  • ही रडार्स वजनाने कमी असल्याने ती त्वरित एका स्थानाहून अन्य स्थानी नेता येतात. तसेच त्यांचे पॅकिंग आणि स्थापनाही सुलभपणे करता येते.
  • या रडार्समुळे भूदलाच्या आक्रमण आणि संरक्षण क्षमतेत मोठी वाढ होणार आहे. अनेक वर्षांपासून भूदलाला अशा रडार्सची आवश्यकता होती. ती आता लवकरच पूर्ण होणार आहे.