
तीन वर्षांच्या वाटाघाटीनंतर आज हिंदुस्थान आणि ब्रिटनमध्ये मुक्त व्यापार करारावर स्वाक्षरी झाली आहे. हिंदुस्थानचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांच्यात लंडनमध्ये झालेल्या भेटीदरम्यान मुक्त व्यापार करारावर स्वाक्षरी करण्यात आली. या करारामुळे दोन्ही देशांमध्ये गुंतवणूक वाढेल आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. यासोबतच जागतिक स्तरावर दोन्ही देशांची अर्थव्यवस्था मजबूत होईल.
हिंदुस्थान आणि ब्रिटनमधील हा करार दोन्ही देशांच्या सामान्य लोकांसाठी खूप फायदेशीर ठरेल, असं बोललं आहेत. यामुळे औषधांपासून ते इलेक्ट्रॉनिक्स आणि फॅशनपर्यंत सर्व काही स्वस्त होईल. मात्र यामुळे काही गोष्टी महागही होतील, ज्याचा थेट परिणाम सामान्य लोकांच्या खिशावर होईल.




























































