
आयर्लंडमध्ये हिंदुस्थानी वंशाच्या लोकांवर वर्णद्वेषातून हल्ल्यांच्या घटना घडत आहेत. एका नऊ वर्षांच्या मुलीवर डर्टी इंडियन… गो बॅक टू इंडिया म्हणत जीवघेणा हल्ला करण्यात आला. आर्यलंडमध्ये वंशद्वेषातून लहान मुलीवर हल्ला झाल्याची ही पहिलीच घटना आहे.
या मुलीवर 12 ते 14 वयोगटातील मुलांनी हल्ला केला. तिच्या चेहऱ्यावर बुक्क्या मारून तीला सायकलच्या टायरच्या सहाय्याने मारहाण केली. या मारहाणीत ती गंभीर जखमी झाली आहे. या प्रकरणा स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
आता सुरक्षित वाटत नाही
मुलीची आई परिचारिका असून गेल्या आठ वर्षांपासून आयर्लंडमध्ये राहते. आयर्लंडमध्ये आता सुरक्षित वाटत नाही अशी प्रतिक्रिया तिने दिली. या मुलांना शिक्षा देण्याऐवजी त्यांचे समुपदेशन करावे, जेणेकरून ही मुले भविष्यात इतर हिंदुस्थानी नागरिकांवर हल्ला करणार नाहीत, अशी इच्छा मुलीच्या आईने व्यक्त केली आहे.


























































