
हिंदुस्थानी हवाई दल (एअर फोर्स) मध्ये एकूण 153 जागांसाठी भरती करण्यात येणार आहे. ही भरती सी ग्रुप डिव्हीजनची असून यामध्ये हिंदी टायपिस्ट, स्टोअर कीपर, सिव्हिलियन मेपॅनिकल ट्रान्सपोर्ट ड्रायव्हर, कुक, पेंटर, हाऊस कीपिंग स्टाफ, लॉण्ड्रीमॅन, मेस स्टाफ, मल्टी टास्क स्टाफ यासारखी पदे भरली जाणार आहेत. या सर्व पदांसाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 15 जून 2025 असून उमेदवाराचे वय किमान 18 ते 25 वर्षे असायला हवे. भरतीसंबंधी सविस्तर माहिती हवाई दलाची अधिकृत वेबसाईट indianairforce.nic.in वर देण्यात आली आहे.