
सुपरहिट ‘बॉर्डर’ चित्रपटाचा सिक्वेल लवकरच प्रदर्शित होणार आहे. त्याबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे. अशातच चित्रपटाची टीम नुकतीच एका गाण्यांच्या लाँचिंग कार्यक्रमात पोहोचली होती, पण या कार्यक्रमाची सारी वाहवा चित्रपटाच्या कलाकारांनी नव्हे, तर बीएसएफच्या जवानांनी मिळवली. बीएसएफ जवानांनी चित्रपटाच्या गाण्यांवर खूप सुंदर नृत्य केले. बीएसएफ जवानांनी ‘बॉर्डर’ चित्रपटातील ‘संदेसे आते है’ या नवीन गाण्यावर नाचायला सुरुवात केली, तेव्हा त्यांचा उत्साह आणि ऊर्जा कोणत्याही डान्सरपेक्षा कमी नव्हती. जवानांच्या चेहऱ्यावर आनंद आणि देशभक्तीची भावना होती. हा व्हिडीओ जबरदस्त व्हायरल होत आहे. त्यावर कमेंट्सचा वर्षाव होत आहे.



























































