दिलासा! सोने आणि चांदीच्या दरात घसरण

लाखाच्या घरात पोहोचलेले सोने आणि चांदीचे दर आता हळूहळू कमी होताना दिसत आहेत. मंगळवारी सोन्याच्या किमतीत 727 रुपये, तर चांदीच्या दरात 800 रुपयांची घसरण झाली. 24 पॅरेट सोन्याचा दर 10 ग्रॅमसाठी 93,058 रुपये झाला आहे, तर चांदीचा दर प्रति किलो 94,954 रुपये झाला आहे. 21 एप्रिल रोजी सोन्याचा भाव तब्बल 99,100 रुपयांपर्यंत पोहोचला होता, तर 28 मार्च रोजी चांदीचा दर प्रति किलो 1 लाख 934 रुपये झाला होता. मुंबईत 22 कॅरेट सोन्याची किंमत 87,199 रुपये प्रति तोळा झाली आहे. दिल्लीत मात्र एका तोळ्यासाठी 87,250 रुपये मोजावे लागतील.