एअर इंडियाच्या बोईंग 787 चे उड्डाण थांबवा, भारतीय पायलट महासंघाची नागरी विमान वाहतूक मंत्रालयाकडे मागणी

एअर इंडियाच्या सर्व बोईंग 787 ड्रीमलायनर विमानांचे उड्डाण बंद करून त्यांना ग्राऊंड करा, अशी मागणी भारतीय पायलट महासंघाने नागरी विमान वाहतूक मंत्रालयाकडे केली आहे. या विमानांमध्ये वारंवार होणाऱ्या बिघाडांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. विशेषतः नवीन अभियंत्यांच्या देखभालीनंतर मिनिमम इक्विपमेंट लिस्ट (एमईएल) प्रकाशन आणि पुनरावृत्ती होणाऱ्या बिघाडांची चौकशी करणेही आवश्यक आहे, असे भारतीय पायलट महासंघाने पेंद्रीय मंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.

मागील आठवडय़ात दोनदा बोईंग 787 विमानात बिघाड झाल्यामुळे ही मागणी करण्यात आली आहे. 9 ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रियातील व्हिएन्ना येथून दिल्लीला जाणारे एअर इंडियाचे विमान एआय 154 तांत्रिक समस्येमुळे दुबईत उतरले. तर दुसऱ्या घटनेत 4 ऑक्टोबर रोजी अमृतसरहून बार्ंमगहॅम, इंग्लंडला जाणारे एअर इंडियाचे विमान एआय-117 (बोईंग ड्रीमलायनर 787-8) चे बार्ंमगहॅम विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. या दोन घटनेनंतर एफआयपीने नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (डीजीसीए)कडून विद्युत प्रणालीची तपासणी आणि एअर इंडियाचे विशेष ऑडिट करण्याची मागणी केली आहे. एफआयपीचे अध्यक्ष पॅप्टन सीएस रंधावा यांनी या प्रकरणी नागरी विमान वाहतूक मंत्री के. राममोहन नायडू यांना पत्र लिहिले आहे. एफआयपी यांनी पाठवलेल्या पत्राला पेंद्रीय मंत्रालयाने अद्याप प्रतिसाद दिलेला नाही.