शेअर बाजार उसळला, सेन्सेक्स 677 अंकांनी वधारला

सोमवारी हिंदुस्थानी शेअर बाजार उसळला. सेन्सेक्स 677 अंकांनी वधारून 81,796 अंकांवर बंद झाला आहे, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 227 अंकांनी वाढून 24,946 अंकांवर बंद झाला आहे. आज एनएसईवर 3021 शेअर्सची ट्रेडिंग झाली. यातील 1483 शेअर्स वधारले, तर 1448 शेअर्समध्ये घसरण झाली. भारत इलेक्ट्रिक, एसबीआय लाइफ इन्शूरन्स, अल्ट्राटेक सिमेंट, एचडीएफसी लाइफ आणि टेक महिंद्राचे शेअर्स वाढले. इराण-इस्रायल युद्धाचा परिणाम शेअर बाजारावर दिसेल असे वाटत होते, परंतु गुंतवणूकदारांनी याकडे दुर्लक्ष केल्याने शेअर बाजार उसळल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे.