
कॉमेडियन समय रैनाच्या ‘इंडियाज गॉट लेटेंट’ शोमध्ये यूट्युबर रणवीर अलाहाबादियाने वादग्रस्त आणि अश्लील टिपणी केली. याप्रकरणात यूट्यूबर विरोधात मुंबई पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली. यानंतर समय रैनाने शोचे सर्व व्हिडीओ यूट्यूबवरून डिलीट केले. या घटनेनंतर अनेक कलाकरांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या. काहींनी समय आणि रणवीरला पाठिंबा दिला, तर काहीनी त्यांची कानउघडणी केली. अशातच आता अभिनेता पंकज त्रिपाठीने देखील प्रतिक्रिया दिली आहे.
IGL controversy वर अभिनेता पंकज त्रिपाठीने समय आणि रणवीरला खडे बोल सुनावले. ‘हे इंटरनेटचे जग आहे. येथे प्रत्येकाला स्वत:चे मत आहे. मात्र, बोलताना भान असायला हवं. इंटरनेटमुळे अनेक लोकांना प्रसिद्धी मिळाली. पण संवेदनशीलता कुठे आहे? त्याच्याकडे साहित्यिक ज्ञान, सामाजिक वर्तन इत्यादी बाबतीत आवश्यक असलेली बुद्धिमत्ता आहे का? आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाची सांस्कृतिक मूल्ये प्रत्येकाला माहित असणे आवश्यक आहे, असे पंकज त्रिपाठी म्हणाला.
कोणत्याही प्लॅटफॉर्मवर बोलताना काही मर्यादा असतात. स्पष्ट सेन्सॉरशिप नसल्याने मनोरंजनाच्या नावाखाली तुम्ही काहीही बोलू शकता, असा अर्थ होत नाही. चुकीच्या गोष्टी बोलल्यानंतर त्याची मजा घेणे समजू शकतो. पण चुकीच्या गोष्टी बोलून त्याचा अभिमान बाळगणे बरोबर नाही. त्याउपरही सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आपले बोलणे कधीही पूर्णपणे निरर्थक नसावे, असे पकंज त्रिपाठीने सुनावले.
“या सगळ्याला इतके महत्त्व देऊ नका. हा एक संसर्ग आहे. हे प्रकरण काही काळचं चर्चेत राहिल. यानंतर आपणही आयुष्यात पुढे निघून जाऊ. ‘यश का आणि कसे मिळते हे बऱ्याच गोष्टी ठरवतात. अर्थात, मी कोण बरोबर आहे किंवा कोण चूक आहे याबद्दल वाद घालत नाहीये… पण, जर तुमच्याकडे शब्दांची ताकद असेल आणि तुम्ही जे बोलत आहात त्याचा लोकांवर परिणाम होत असतो. त्यामुळे बोलताना काळजी घेतलीच पाहिजे, असा मोलाचा सल्ला यावेळी पंकज त्रिपाठीने दिला.
Ranveer Allahbadia ची सुप्रीम कोर्टात धाव, लवकर सुनावणीची मागणी