
पटनाहून रांचीला येणाऱ्या इंडिगो विमानाला पक्षाने धडक दिली. यामुळे विमानाचे आपत्कालीन लँडिंग करावी लागली. यामुळे मोठी दुर्घटना टळली. विमानातील सर्व प्रवासी सुखरुप आहेत. प्रवाशांना तात्काळ एअरपोर्ट टर्मिनलवर नेण्यात आले. विमानाची तपासणी सुरू आहे.
इंडिगोचे विमान 6E 6152 हे पटनाहून रांचीला येत होते. रांचीतील बिरसा मुंडा विमानतळावर लँडिंग करण्याआधी सुमारे 4 हजार फूट उंचीवर पक्षाने विमानाला धडक दिली. यानंतर पायलटने विमान सुरक्षित धावपट्टीवर उतरवले. या विमानात 175 प्रवासी होते. सर्व प्रवासी सुखरुप आहेत.