
देशातील आघाडीची सॉफ्टवेअर कंपनी इन्फोहसिसने फ्रेशर्सचे सुरुवातीचे वेतन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये विशेष तंत्रज्ञान पदावर रुजू होणाऱ्यांना वार्षिक 21 लाख रुपयांपर्यंतचे पॅकेज देण्यात येणार आहे. देशातील आयटी सेक्टरमध्ये फ्रेशर्ससाठी ही खूप मोठी रक्कम मानली जाते. एआय क्षेत्रात प्रतिभावंत कर्मचारी आकर्षित व्हावेत, यासाठी इन्फोहसिस भरती प्रक्रिया वाढवत आहे.
इन्फोहसिस 2025 च्या अभियांत्रिकी आणि संगणक विज्ञान पदवीधरांसाठी एक ऑफ-कॅम्पस भरती प्रक्रिया सुरू करणार असल्याचे समजते. या भरती प्रक्रियेद्वारे विशेष तंत्रज्ञान पदांसाठी प्रतिभावान उमेदवारांची भरती केली जाईल. यासाठी वार्षिक पगार 7 लाख ते 21 लाख रुपयांपर्यंत असेल.
कोणत्या नोकऱ्यांमध्ये संधी
- या नोकरीच्या संधींमध्ये स्पेशालिस्ट प्रोग्रामर आणि डिजिटल स्पेशालिस्ट इंजिनीअर यांचा समावेश आहे. या जागा कॉम्प्युटर सायन्स, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी तसेच इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनीअरिंग आणि इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंगसारख्या निवडक शाखांमधील पदवीधरांसाठी असणार आहेत.
- आयटी सेवा क्षेत्रातील प्रमुख कंपनी इन्पहसिसने आर्थिक वर्ष 2026 च्या पहिल्या सहामाहीत 12 हजार फ्रेशर्सना नोकरीवर घेतले आहे आणि कंपनी या वर्षासाठी 20,000 फ्रेशर्सना नोकरीवर घेण्याचे आपले लक्ष्य पूर्ण करण्याच्या मार्गावर आहे, असे इन्पहसिसचे सीएफओ जयेश संघराजका यांनी 16 ऑक्टोबर रोजी कंपनीच्या दुसऱया तिमाहीचा अहवाल सादर करताना सांगितले होते.





























































