ट्रेंड – छंदाचे व्यवसायात रूपांतर

स्वप्न पूर्ण करण्यासाठी कष्टाची तयारी हवी. मग परिस्थिती कधीच आडवी येत नाही. अशाच एका तरुणीची प्रेरणादायी गोष्ट व्हायरल होतेय. तिचे नाव सफुरा आहे. सफुराने तिच्या गाडी चालवण्याच्या आवडीचे व्यवसायात रूपांतर केले. प्रवासी तमन्ना तनवीर बंगळुरूमध्ये उबर, ओला, रॅपिडो बुक करण्याचा प्रयत्न करत होती. त्यादरम्यान तिची भेट सफुराशी झाली; जी एक महिला रिक्षाचालक होती. त्यादरम्यान दोघींचा संवाद सुरू होतो आणि तमन्ना तिला प्रश्न विचारण्यास सुरुवात करते. तमन्नाला समजले की, सफुराला गाडी चालवायला खूप आवडते. कार, ऑटो, बाईक अगदी कोणतेही वाहन ती चालवू शकते. तिला स्विफ्ट कार खरेदी करायची होती, पण तिचे बजेट कमी होते. म्हणून तिने एक रिक्षा खरेदी केली. 29 वर्षीय सफुराचा व्हिडीओ  @tamannapasha_official या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे.