
ऑस्ट्रेलियातील सिडनी येथील प्रसिद्ध बोंडी बीचवर रविवारी हनुक्का उत्सवादरम्यान दोन बंदुकधाऱ्यांनी अंधाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात 10 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. घटनेमुळे परिसरात घबराट पसरली. नागरिकांनी घटनास्थळापासून दूर राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. गोळीबार प्रकरणी पोलिसांनी दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
घटनेचाी माहिती मिळताच न्यू साउथ वेल्स पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. प्रत्यक्षदर्शींनी दिलेली माहिती आणि सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओनुसार, एका पुलावर दोन बंदुकधारी काळ्या पोशाखात दिसत आहेत. त्यांनी अनेक राउंड गोळीबार केला. गोळीबारानंतर जीव वाचवण्यासाठी लोक इकडे तिकडे पळताना दिसत आहेत. हनुक्का उत्सवादरम्यान हा हल्ला झाल्याचे प्राथमिक मिळते. बोंडीच्या चाबाडने आयोजित केलेला “चानुका बाय द सी” कार्यक्रम सुरू असताना हा गोळीबार झाला. गोळीबारात किमान 10 लोकांचा मृत्यू झाला आहे.


























































