आयफोन 17 सीरिज लाँचिंगची तारीख लीक

आयफोन 17 सीरिजच्या लाँचिंगची आयफोन चाहत्यांना मोठी उत्सूकता लागली आहे. अॅपल कंपनी आपली आगामी सीरिज आयफोन 17 येत्या 9 सप्टेंबर 2025 ला लाँच करणार आहे, अशी माहिती काही रिपोर्टकडून लीक करण्यात आली आहे. अॅपल कंपनीकडून अद्याप लाँचिंगच्या तारखेबद्दल कोणतीही माहिती देण्यात आली नाही. गेल्या वर्षी कंपनीने आयफोन 16 सीरिज 9 सप्टेंबरला लाँच केली होती. आयफोन 17 सीरिजमध्ये आयफोन 17, आयफोन 17 प्रो, आयफोन 17 प्रो मॅक्स आणि आयफोन 17 एअर लाँच केले जाण्याची शक्यता आहे.