आयफोन 17 प्लसऐवजी आता एअर येणार

आयफोन 17 सीरिज पुढील महिन्यात लाँच केली जाणार आहे. कंपनी नव्या सीरिजमध्ये चार फोन लाँच करणार आहे. यामध्ये आयफोन 17, आयफोन 17 प्रो, आयफोन 17 प्रो मॅक्स आणि आयफोन 17 प्लसऐवजी आयफोन 17 एअर हे चार फोन लाँच करणार आहे. आयफोन 17 एअरमध्ये 6.6 इंचाचा डिस्प्ले मिळणार आहे. हा फोन स्लीम फोन असणार आहे. या फोनचे वजन आणि नवीन डिझाईन ग्राहकांना आकर्षित करणार आहे.