
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हिंदुस्थानवर 25 टक्के टॅरिफ लावण्याची घोषणा केली आहे. ट्रम्प यांच्या या निर्णयामुळे हिंदुस्थानला जोरदार फटका बसणार आहे. हिंदुस्थानातून अमेरिकेत आयात होणाऱ्या आयफोनलाही याचा दणका बसणार असून आयफोनच्या किमती 25 हजार रुपयांपर्यंत महागणार आहेत.
ट्रम्प यांच्या या निर्णयानंतर अॅपल कंपनीला आपल्या धोरणात बदल करावा लागण्याची शक्यता आहे. हिंदुस्थानात बनवण्यात येणारे जवळपास 25 टक्के आयफोन हे अमेरिकेत विकले जातात. कंपनीला अमेरिकेसाठी दरवर्षी सहा कोटी आयफोन बनवावे लागतात. अमेरिकेला इतक्या मोठ्या प्रमाणात आयफोनचा पुरवठा करण्यासाठी अॅपलला प्रोडक्शन वाढवण्याची आवश्यकता वाटत होती, परंतु ट्रम्प यांच्या नव्या टॅरिफ बॉम्बमुळे कंपनीला आता या योजनेचा फेरविचार करावा लागू शकतो.
मार्च 2025 च्या अखेरपर्यंत अॅपल कंपनीने हिंदुस्थानात जवळपास 22 बिलियन डॉलर म्हणजेच 1.83 लाख कोटी आयफोन बनवले आहेत. जे गेल्या वर्षीच्या तुलनेत 60 टक्के अधिक आहेत. जगात विकल्या जाणाऱ्या प्रत्येक पाचपैकी एक फोन हिंदुस्थानात बनवलेला आहे.