
Indian Premier League 2026 ची धाकधुक सुरू झाली आहे. 16 डिसेंबर रोजी अबू धाबीला मिनी लिलाव प्रक्रिया पार पडणार आहे. 359 खेळाडू या लिलाव प्रक्रियेच्या प्रतिक्षेत आहेत. तसेच संघ मालक सुद्धा कोणत्या खेळाडूला संघात घ्यायचं, यासाठी चाचपणी करत आहेत. मात्र, याच दरम्यान एक घोळ झाल्याचे निदर्शनास आले आहे. ऑस्ट्रेलिचाया अष्टपैलू खेळाडूची लिलाव प्रक्रियेसाठी फक्त फलंदाज म्हणून नोंद करण्यात आली आहे. मात्र, यावर आता कॅमरून ग्रीनने आपली बाजू स्पष्ट केली आहे.
कॅमरून ग्रीनने स्पष्ट केले आहे की, तो IPL 2026 मध्ये फक्त फलंदाजी नाही तर गोलंदाजी करण्यासाठी सुद्धा तयार आहे. लिलाव प्रक्रियेसाठी त्याची नोंद फक्त फलंदाज म्हणून करण्यात आली होती. त्यामुळे संभ्रम निर्माण झाला होता. हा सर्व प्रकार कॅमरून ग्रीनच्या मॅनेजरच्या चुकीमुळे झाल्याच समोर आलं आहे. Ashes 2025-26 च्या तिसऱ्या कसोटी सुरू होण्यापूर्वी ट्रेनिंग सेशन दरम्यान प्रसार माध्यमांशी संवाद साधताना कॅमरून ग्रीन म्हणाला की, “IPL 2026 लिलाव प्रक्रियेसाटी नोंदणी करताना मॅनेजरने चुकून अष्टपैलू खेळाडूच्या जागी फलंदाज या चिन्हावर क्लिक केलं होतं. मात्र, मी गोलंदाजी करण्यासाठी पूर्णपणे तंदुरुस्त आहे.” असं कॅमरून ग्रीनने स्पष्ट केलं आहे.
कॅनरून ग्रीनने 2023 साली IPL मध्ये पदार्पण केले होते. मुंबई इंडियन्सकडून तौ पहिल्यांदा मैदानात उतरला होता. त्या हंगामात त्याने 452 धावा आणि 6 विकेट घेतल्या होत्या. तर 2024 साली तो रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा भाग होता. 2025 साली दुखापतीमुळे त्याने लिलाव प्रक्रियेमध्ये भाग घेतला नाही. मात्र आता तो पूर्णपणे तंदुरुस्त असून त्याच्यावर मोठी बोली लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


























































