
आयपीएल 2026 चा मिनी लिलाव 13 ते 15 डिसेंबरदरम्यान हिंदुस्थानात होणार आहे. गेल्या दोन वर्षांपासून हा लिलाव परदेशात झाला होता. लिलावासंदर्भात बीसीसीआयने सर्व दहा फ्रेंचायझींना कळवले असून 15 नोव्हेंबर ही खेळाडू रिटेन्शनची अंतिम तारीख दिली आहे. या लिलावादरम्यान चेन्नई आणि बंगळुरू संघात काही मोठे फेरबदल केले जाणार असल्याचीही माहिती देण्यात आली आहे. चेन्नई आपल्या संघातून डेव्हन कॉनवे, सॅम करण, दीपक हुडा, विजय शंकर आणि राहुल त्रिपाठी यांना रिलीज करण्याची शक्यता आहे. तसेच राजस्थान रॉयल्सकडूनही संघात फेरबदलाची आणि संजू सॅमसनच्या कर्णधारपदावरील पुनर्विचाराची चर्चा सुरू आहे.




























































