इराणने अमेरिकेचे F-15 लढाऊ विमान पाडले, पायलटला जिवंत पकडल्याचा केला दावा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव शिगेला पोहोचला असून, इराणने अमेरिकेचे एक लढाऊ विमान पाडल्याचा मोठा दावा केला आहे. ‘आज तक’ने दिलेल्या वृत्तानुसार, इराणच्या निमलष्करी दलाने अमेरिकन हवाई दलाचे F-15E स्ट्राइक ईगल विमान पाडले असून, त्यातील पायलटला जिवंत पकडल्याचे म्हटले आहे.

इराणची वृत्तसंस्था ‘तस्नीम’च्या हवाल्याने मिळालेल्या माहितीनुसार, इराणने सुरुवातीला हे विमान अत्याधुनिक F-35 असल्याचे म्हटले होते. मात्र घटनास्थळावरून मिळालेल्या विमानाच्या मलब्यावरून ते विमान F-35 नसून अमेरिकन हवाई दलाचे F-15E असल्याचे स्पष्ट झाले आहे. इराणच्या सैन्याने या विमानाला लक्ष्य करून ते खाली पाडले.

या घटनेतील सर्वात खळबळजनक बाब म्हणजे विमानातील पायलटला इराणने जिवंत पकडल्याची दावा केला आहे. तस्नीम वृत्तसंस्थाने दिलेल्या वृत्तानुसार, विमानातून पॅराशूटच्या साहाय्याने खाली उतरलेल्या अमेरिकन पायलटला इराणी सैनिकांनी ताब्यात घेतले आहे. या वृत्तामुळे अमेरिकन प्रशासनामध्ये खळबळ उडाली आहे.