
अमेरिका, इस्त्रायल आणि इराण युद्धाचा सर्वाधिक फटका एपीएमसी मार्केटमधील सुकामेव्याला बसला आहे. सध्या रमजान महिना सुरू असल्यामुळे सुकामेव्याच्या दरात वाढ झाली टक्क्यांनी आणखी भडकले आहेत. होती. त्यातच युद्धाला सुरुवात झाल्यामुळे एपीएमसीच्या मसाला मार्केटमध्ये सर्वाधिक सुकामेवा अमेरिका, अफगाणिस्तान आणि इराणमधून येतो. मात्र युद्ध सुरू झाल्यामुळे या देशांतून होणारी आयात पूर्णपणे थांबली आहे. अनेक जहाजे आखातामध्ये अडकून पडली आहेत. अमेरिकेतून आपल्या देशात अंजीर आणि मनुक्याची मोठ्या प्रमाणात आयात होते. युद्धामुळे ही आयात पूर्णपणे ठप्प झाल्याने त्याचा परिणाम अंजीर आणि मनुक्यांच्या दरावर झाला आहे. अफगाणिस्तानमधून हिंदुस्थानात पिस्ता, अंजीर मनुका आणि खजूर आदींची मोठ्या प्रमाणात आयात होते. हा सर्व सुकामेवा समुद्रमार्गी येत असतो. सध्या युद्ध सुरू असल्यामुळे समुद्रमार्गाने होणारी मालवाहतूक थांबली आहे. हिंदुस्थानमधून अफगाणिस्तानमध्ये अनेक वस्तू पाठवल्या जातात. मात्र ही निर्यातही सध्या पूर्णपणे ठप्प झाली आहे. खजूर आणि अंजिराच्या दरात सुमारे ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे.
पिस्ता १६०० रुपये किलो
रमजान महिना सुरू होण्यापूर्वी पिस्ता हा १ हजार २०० रुपये किलो या दराने विकला जात होता. रमजान महिन्यात पिस्त्याच्या दरात सुमारे १०० रुपयांनी वाढ होऊन किलोचा दर १ हजार ३०० रुपयांपर्यंत गेला. मात्र आता युद्ध सुरू झाल्यानंतर पिस्त्याचा दर थेट १ हजार ६०० रुपये किलोपर्यंत पोहोचला आहे. अन्य सुकामेव्याच्या दरातही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.



























































