
मध्यपूर्वेत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या हवाई दलाला मोठा धक्का बसला आहे. पश्चिम इराकमध्ये शुक्रवारी एक बोईंग KC‑135 इंधन भरणारे लष्करी विमान कोसळले. या अपघातात विमानातील सहा क्रू मेंबर्सपैकी चार जणांचा मृत्यू झाला असून उर्वरित दोघांचा शोध सुरू आहे. अमेरिकन लष्कराकडून सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट करून या घटनेची माहिती दिली. सेंटकॉमच्या माहितीनुसार, अपघाताच्या वेळी विमानात सहा क्रू सदस्य होते. त्यापैकी चार जणांचा मृत्यू झाला असून उर्वरित दोघांसाठी शोध आणि बचाव मोहीम सुरू आहे.
Four Confirmed Deceased in Loss of U.S. KC-135 Over Iraq
TAMPA, Fla. – At approximately 2 pm ET on March 12, a U.S. KC-135 refueling aircraft went down in western Iraq. Four of six crew members on board the aircraft have been confirmed deceased as rescue efforts continue.
The…
— U.S. Central Command (@CENTCOM) March 13, 2026
सेंटकॉमने सांगितले की या अपघाताचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. सध्या या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून तपासातून मिळणारी माहिती पुढे जाहीर केली जाईल.
अमेरिकन लष्कराने प्राथमिक तपासात स्पष्ट केले आहे की, हा अपघात शत्रूचा हल्ल्यामुळे झालेला नाही. Boeing KC‑135 Stratotanker हे अमेरिकन हवाई दलाचे इंधन भरणारे टँकर विमान आहे. हे विमान हवेतच इतर लष्करी विमानांना इंधन पुरवते. यामुळे लढाऊ विमाने किंवा बॉम्बफेकी विमाने दीर्घकाळ आकाशात राहू शकतात आणि लांब पल्ल्याच्या लष्करी मोहिमा अधिक प्रभावीपणे पार पाडू शकतात.
सध्या मध्यपूर्वेत इराण आणि इस्त्रायल तसेच अमेरिकेतील तणाव वाढलेला आहे. अशा परिस्थितीत हा अपघात घडल्याने सुरुवातीला हल्ल्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र अमेरिकन लष्कराने प्राथमिक तपासात हल्ल्याचा संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे.

























































