
पूर्व काँगोमध्ये आयसिस समर्थित दहशतवाद्यांनी रविवारी एका चर्चवर हल्ला केला. या किमान हल्ल्यात 21 जणांचा मृत्यू झाला आहे. पूर्व काँगोच्या कोमांडा येथील कॅथोलिक चर्च कॉम्प्लेक्समध्ये रात्री 1 वाजता अलाइड डेमोक्रॅटिक फोर्स (एडीएफ) च्या सदस्यांनी हा हल्ला केला. एका नागरी संघटनेच्या नेत्याने याबाबत माहिती दिली.
दहशतलवाद्यांनी चर्चच्या आत आणि बाहेरच्या परिसरात 21 हून अधिक लोकांना गोळ्या घातल्या. आम्हाला तीन जळालेले मृतदेह सापडले आहेत. या हल्ल्यात अनेक घरे आणि दुकानेही जाळल्याचे वृत्त आहे. परिसरात शोध मोहिम सुरू आहे, असे कोमांडा येथील नागरी समाज समन्वयक डियुडोने दुरांथाबो यांनी सांगितले. कोमांडा स्थित इटुरी प्रांतातील कांगोली सैन्याच्या प्रवक्त्याने 10 जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी केली.