
अमेरिका, इस्रायल-इराण युद्धामुळे जगभरात तणावाचे वातावरण आहे. तसेच कच्च्या तेलाच्या किमती वाढतच आहे. तसेच या युद्धामुळे दुबईतील हजारो वर्षांची परंपरा खंडीत झाली आहे. रमजानच्या पवित्र महिन्यात दुबईमध्ये इफ्तारच्यावेळी हवेत तोफा डागण्याची परंपरा आहे. मात्र, यंदा ही परंपरा खंडीत झाली आहे. या वर्षी रमजानचा चंद्र दिसल्यानंतर तोफ डागण्यात आली आणि त्यानंतर सुमारे आठवडाभर इफ्तार दरम्यान हवेत तोफा डागण्यात आल्या. मात्र, अमेरिका,इस्रायल-इराण युद्ध सुरू झाल्यावर २८ फेब्रुवारीपासून दुबईसह संयुक्त अरब अमिरातीमध्ये इफ्तारवेळी हवेत डागण्यात येणाऱ्या तोफा थंडावल्या आहेत.
दुबईसह संयुक्त अरब अमिरातीमध्ये इफ्तार दरम्यान हवेत तोफा डागण्याची परंपरा थांबवण्यात आली आहे. अमेरिका,इस्रायल इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर हा निर्ण घेण्यात आला आहे. इराणवरील अमेरिका-इस्रायल हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून इराण आखाती देशांमध्ये अमेरिकन लष्करी तळांना सतत लक्ष्य करत आहे. इराण दुबईवर सतत हल्ले करत आहे, ज्यामुळे युएईमध्ये इफ्तार दरम्यान तोफांचा वापर थांबवण्यात आला आहे.
दुबईमध्ये रमजानच्या सुरुवातीपासून ते ईदच्या चंद्रोदयापर्यंत दररोज इफ्तार दरम्यान हवेत तोफा डागण्याची परंपरा आहे. इराण युद्धामुळे दहशत निर्माण होऊ शकते अशी भीती असल्याने या शतकानुशतके जुनी परंपरा यावेळी अचानक बंद करण्यात आली आहे. त्यामुळे आता दुबईमध्ये इफ्तार दरम्यान तोफगोळ्यांचा वापर केला जात नाही. माध्यमांशी बोलताना दुबई पोलिसांचे लेफ्टनंट कर्नल अब्दुल्ला अमीमी म्हणाले की, रमजानमध्ये इफ्तार दरम्यान हवेत तोफा डागण्याची परंपरा थांबवण्यात आली आहे. इराण आणि अमेरिका यांच्यात युद्ध सुरू असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून दुबई पोलिसांनी हा निर्णय घेतला आहे.
दुबई पोलिसांना भीती आहे की इफ्तार दरम्यान तोफगोळ्याचा मोठा आवाज लोकांमध्ये भीती निर्माण करू शकतो, कारण ते क्षेपणास्त्र हल्ला किंवा हल्ला समजू शकतात. म्हणून, तोफगोळ्याची परंपरा थांबवण्यात आली आहे. आता तोफांऐवजी इफ्तारच्या वेळी ढोल वाजवले जात आहेत. दुबईमध्ये लोक तोफेच्या आवाजाने रोजा सोडत असत. ही शतकानुशतके जुनी परंपरा आहे, परंतु सध्याची परिस्थिती पाहता, नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत दुबई पोलिसांनी ही प्रथा तात्पुरती थांबवली आहे. लोकांमध्ये भीती निर्माण होऊ नये म्हणून इफ्तारच्या वेळी आता तोफेऐवजी पारंपारिक ढोल वापरला जात आहे.
रमजानच्या वेळी दुबईमध्ये पारंपारिकपणे सहा ठिकाणी तोफांचा गोळीबार केला जातो. यामध्ये जुमेराह बीच रेसिडेन्स (जेबीआर), बुर्ज खलिफा, दमक हिल्स, एक्स्पो सिटी दुबईमधील अल वसल प्लाझा, दुबई फेस्टिव्हल सिटी आणि विडा क्रीक हार्बर हॉटेल यांचा समावेश आहे. शिवाय, दुबई पोलिसांनी पवित्र महिन्यात अमिरातीच्या विविध भागात फिरणाऱ्या मोबाईल तोफांसाठी १७ ठिकाणे तयार केली आहेत. रमजान दरम्यान तोफ डागण्याची परंपरा ही युएईमधील सर्वात प्रिय परंपरांपैकी एक आहे. दुबईमध्ये रमजान दरम्यान दररोज तोफ डागण्याचे समारंभ कुटुंबे आणि पर्यटकांना आकर्षित करत असत. मात्र, युद्धामुळे ही परंपरा खंडीत झाली आहे.

























































