
हिंदुस्थानच्या रुपयाचे दिवसेंदिवस अवमूल्यन सुरू आहे. डॉलरच्या तुलनेत रुपया थेट 94 वर पोहोचला आहे. लवकरच रुपया शंभरी गाठेल असे देखील बोलले जात आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाचे हे मूल्य असताना इस्रायली शेलेकचा भाव देखील हिंदुस्थानच्या रुपयापेक्षा जास्त आहे. इस्रायलचा एक शेलेक म्हणजे हिंदुस्थानचे तीस रुपये आहेत.
इस्रायलमध्ये अर्धा लिटर पाण्याच्या बाटलीची किंमत 5 ते 10 शेलेकच्या आसपास आहे. याचाच अर्थ इस्रायलमध्ये हिंदुस्थानी व्यक्तीला अर्धा लीटरच्या पाण्याच्या बाटलीसाठी तब्बल दीडशे ते तीनशे रुपये मोजावे लागतात. याचाच अर्थ हिंदुस्थानात मिळणाऱ्या 10 रुपयांच्या पाण्याच्या बाटलीसाठी इस्रायलमध्ये जवळपास 300 रुपये मोजावे लागतात. TV9 मराठीने याबाबत वृत्त दिले आहे.



























































