तेहरानमधील एविन तुरुंग, सरकारी इमारतींवर इस्रायलचे हल्ले

अमेरिकेने अणुऊर्जा प्रकल्पांवर हल्ला केल्यानंतर इराण-इस्रायलमध्ये हल्ले-प्रतिहल्ले सुरूच आहेत. इस्रायलने पुन्हा एकदा इराणमध्ये हल्ला केला असून सरकारी इमारतींना लक्ष्य केले आहे. इराणच्या पर्ह्डो आण्विक पेंद्राचा परिसर, तेहरानमधील कुख्यात एविन हा तुरुंग आणि इराणचे निमलष्करी दल असलेल्या रेव्हलुशनरी गार्डचे मुख्यालयदेखील उद्ध्वस्त केल्याचा दावा इस्रायलने केला आहे. इराणच्या हुकूमशहाला अद्दल घडवणार, अशी धमकी इस्रायलने दिली आहे.

अमेरिकेने शनिवारी इराणमधील पर्ह्दो, नतांन्झ आणि इस्फाहन या तीन अणुपेंद्रांवर हल्ला केला होता. त्याला प्रत्युत्तर देत इराणने इस्रायलमध्ये हल्ले चढवले होते. त्यानंतर इस्रायलने आज इराणमधील प्रशासकीय कार्यालयांना लक्ष्य केले. त्याचबरोबर, पर्ह्दो अणुपेंद्रांकडे जाणारे सर्व मार्ग उद्ध्वस्त केले. या अणुपेंद्राची रसद तोडून टाकण्याच्या उद्देशाने इस्रायलने हा हल्ला केला.

एविन तुरुंगावर हल्ला का?

इराणमध्ये हल्ले करताना इस्रायलने तेहरानमधील एविन तुरुंगालाही लक्ष्य केले. एविन तुरुंग हा इराणमधील सर्वात खतरनाक तुरुंग मानला जातो. या तुरुंगात पाश्चात्य देशातील पैद्यांना ठेवले जाते. येथे पैद्यांचा अमानुष छळ केला जातो. पश्चिमी देशांशी वाटाघाटी करण्यासाठी इराणकडून येथील पैद्यांचा वापर केला जातो. हा तुरुंग थेट अयातुल्लाह खामेनी यांच्या नियंत्रणाखाली आहे. येथील रेव्होलुशनरी गार्डचे जवान थेट खामेनी यांना रिपोर्ट करतात. 2003 साली या तुरुंगातून सुटलेल्या एका महिलेने येथील नरकवासाची माहिती उघड केली होती.