इस्रो-नासाचा निसार उपग्रह आज प्रक्षेपित होणार

इस्रो आणि नासा पहिल्यांदाच संयुक्तपणे निसार उपग्रह प्रक्षेपित करणार आहे. 30 जुलै रोजी सायंकाळी 5 वाजून 40 मिनिटांनी आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून प्रक्षेपित केला जाईल. नासाकडून एल बँड, तर इस्रोकडून एस बँड असे दोन विशेष रडार आहेत. हे एकत्रितपणे पृथ्वीचे अतिशय स्पष्ट आणि तपशीलवार फोटो पाठवतील. या उपग्रहामुळे शास्त्रज्ञांना भूकंप, ज्वालामुखी, भूस्खलन, हिमवर्षाव, हिमनद्या वितळणे, समुद्री वादळे समजून घेण्यास मदत होईल.