
बोइंग स्टारलाइनरमधून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात (आयएसएस ) गेलेल्या आणि गेल्या काही दिवसांपापासून तिथेच अडकलेल्या सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी बच विल्मोर यांच्याबद्दल चिंता व्यक्त होत आहे. अशातच इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ यांनी या दोन्ही अंतराळवीरांच्या परतण्याबाबतची चिंता दूर केली आहे.
सोमनाथ म्हणाले, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक हे दीर्घकालीन मुक्कामासाठी सुरक्षित आहे. तिथे नऊ अंतराळवीर आहेत. ते अडकलेल्या अवस्थेत नाहीत. त्या प्रत्येकाला कधी ना कधी परत यावे लागेल. विषय आहे बोइंग स्टारलाइनरच्या परीक्षणाचा. अंतराळवीरांनी पृथ्वीवर येण्यास लागणारा विलंब म्हणजे बोइंग स्टारलाइनर क्रू मॉडेलच्या क्षमता चाचणीचा एक भाग आहे. डॉ. सोमनाथ यांनी सुनीता विल्यम्स यांचा अभिमान वाटत असल्याचे सांगितले. सुनीता यांनी अनेक अंतराळ मोहिमा केल्या. स्टारलाइनरसारख्या नव्या यानातून पहिले उड्डाण करणे हे खूप धाडसाचे आहे. त्या यशस्वीपूर्ण पृथ्वीवर परताव्यात अशा सदिच्छा सोमनाथ यांनी दिल्या.