
नुकतेच भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्त्रोने महत्त्वाची कामगिरी पार पाडली. इस्रोने श्रीहरिकोटावरून ‘बाहुबली’ रॉकेट ‘एलव्हीएम3’चे यशस्वी प्रक्षेपण केले आणि अमेरिकन कंपनीचा 6100 किलो वजनाचा ‘ब्लू बर्ड’ उपग्रह यशस्वीपणे अंतराळात पाठवला. ‘एलव्हीएम3’च्या यशानंतर इस्त्रोने आता थेट एलन मस्क यांच्या स्पेस एक्सला टक्कर दिली आहे. अंतराळ मार्वैटमध्ये सगळ्यात स्वस्त कोण रॉकेट प्रक्षेपण करते याची चर्चा रंगली आहे. कारण, एलन मस्कची ‘स्पेसएक्स’ कंपनी रॉकेट पुन्हा पुन्हा वापरून खर्च कमी करते, तर इस्त्रो कमी खर्चात रॉकेट तयार करते.
स्पेसएक्सच्या ‘फाल्कन9’ रॉकेटची एक लाँचची किंमत सुमारे 6.7 कोटी डॉलर (सुमारे 550 ते 560 कोटी रुपये) आहे. इस्त्राsच्या एलव्हीएम 3 रॉकेटची एक लॉन्चची किंमत सुमारे 400 ते 450 कोटी रुपये आहे. तसं पाहिले तर इस्त्रोचे रॉकेट एलन मस्कच्या रॉकेटपेक्षा स्वस्त वाटते. पण एक किलो वजन अंतराळात पाठवायला किती खर्च येतो हे बघितले जाते. त्यामुळे इस्त्राs अजून स्पेसएक्सपेक्षा मागे आहे. पण छोटे रॉकेट्स आणि पीएसएलव्हीबाबतीत हिंदुस्थान अजूनही जगात सर्वात स्वस्त पर्यायांपैकी एक आहे. युरोप – अमेरिकेच्या कंपन्या पर्याय म्हणून हिंदुस्थानला अंतराळातील मजबूत भागीदार मानतात.































































