
शिव आरोग्य सेनेचे कार्याध्यक्ष डॉ. किशोर ठाणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि राज्य सरचिटणीस जितेंद्र दगडू सकपाळ यांच्या सूचनेनुसार शिव आरोग्य सेनेच्या वतीने जे.जे. रुग्णालयातील डॉक्टर आणि सर्जरी टीमचा सत्कार करण्यात आला. जळगाव तालुक्यातील विलास पाटील या ट्रक ड्रायव्हरचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांच्या परवानगीने अवयवदानाची प्रक्रिया पूर्ण करून रुग्णालयाच्या टीमने 9 जणांचे प्राण वाचवले, या कामगिरीची शिव आरोग्य सेनेने दखल घेतली.
यावेळी रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. संजय सुरासे. डॉ. अरुण राठोड, डॉ. दिलीप गवारी, प्रमुख रक्तपेढी अधिकारी डॉ. भरत घोडके आणि डॉ. अनाम आणि वैद्यकीय टीमचा गौरव करण्यात आला. यावेळी मलबार हिल विधानसभा समन्वयक सचिव मिलिंद वेदपाठक, कुलाबा विधानसभा समन्वयक शेखर शिर्सेकर, मलबार हिल समन्वयक राजू वर्तक, विधानसभा सचिव निलेश चव्हाण, नागपाडा विधानसभा सचिव राजाराम झगडे, लालबाग प्रभाग समन्वयक नंदकुमार बागवे, आरोग्य मित्र लितेश केरकर आणि पदाधिकारी उपस्थित होते.


























































