उपराष्ट्रपती निवडणूक; जगनमोहन यांचा एनडीएला पाठिंबा

जगनमोहन रेड्डी यांच्या वायएसआर काँग्रेसने उपराष्ट्रपती पदासाठी एनडीएचे उमेदवार सी.पी. राधाकृष्णन यांना पाठिंबा जाहीर केला आहे.

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी जगनमोहन रेड्डी यांच्याशी संपर्क साधून पाठिंबा देण्याची विनंती केली होती. ती रेड्डी यांनी मान्य केली आहे. वायएसआर काँग्रेसचे लोकसभेत 4, तर राज्यसभेत 11 खासदार आहेत. वायएसआर काँग्रेस ही सध्या सत्ताधारी व विरोधी दोन्ही आघाडय़ांपासून अलिप्त आहे. एनडीएमध्ये असलेला चंद्राबाबू नायडू यांचा तेलुगु देसम पक्ष हा आंध्र प्रदेशात जगनमोहन यांचा प्रमुख प्रतिस्पर्धी आहे.