तरुणांची उद्योजकता आणि नेतृत्वाचा रोड मॅप, १७० हून अधिक स्टार्ट अप्सची नोंदणी

Jai Hind College 10th Global Entrepreneurship Summit 170+ Startups Registered

तरुणांना उद्योजकतेकडे आकर्षित करून त्यांच्या नवनवीन कल्पनांना वास्तवात आणण्याची ऊर्जा देण्यासाठी जय हिंद महाविद्यालयात १० वे ग्लोबल आंत्रप्युन्योरशिप समिटचे येत्या १६ आणि १७ जानेवारी रोजी आयोजन करण्यात आले आहे. या समिटमध्ये कीनोट सत्रे, पॅनल चर्चा, कार्यशाळा, नेटवर्विंâग यावर मार्गदर्शन केले जाणार असून यामुळे तरुणांमधील उद्योजकता आणि नेतृत्वाचा रोड मॅपच तयार होणार आहे.

विद्यार्थ्यांना उद्योजक बनण्यास प्रोत्साहन देण्यासाठी गेल्या वर्षांपासून ग्लोबल आंत्रप्युन्योरशिप समिट भरवले जात आहे. या समिटचे मुख्य आकर्षण म्हणजे `स्टार्टअप स्पर्धा’ ज्यामध्ये नवोदित उद्योजक आपले व्यवसाय मॉडेल आणि कल्पना तज्ज्ञ परीक्षकांसमोर सादर करतात. या परीक्षक मंडळात नामांकित उद्योजक, व्यवस्थापकीय संचालक तसेच व्हेंचर कॅपिटल कंपन्यांचे भागीदार यांचा समावेश आहे. यंदाच्या समिटला देश-विदेशातून उत्तम प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत स्टार्टअप स्पर्धेसाठी १७० हून अधिक स्टार्टअप्सची नोंदणी करण्यात आली आहे. गेल्या वर्षीच्या स्टार्टअपना लाखो रुपयांची बक्षिसे देण्यात आली होती. यावेळी ५० हून अधिक उद्योजक सहभागी झाले होते.

नामांकित सीईओंचे मार्गदर्शन

दोन दिवसांच्या या कार्यक्रमात कीनोट सत्रे, पॅनल चर्चा, कार्यशाळा आणि नेटवर्विंâग सत्रे आयोजित करण्यात येणार असून नेतृत्व, नवोन्मेष, ब्रँड बिल्डिंग आणि दीर्घकालीन व्यवसायवृद्धी यावर भर दिला जाणार आहे. समिटमधील प्रमुख वत्तäयांमध्ये चीफ आर अ‍ॅण्ड डी ऑफिसर अनुभव सक्सेना, रुस्तमजीचे सीईओ मनीष रांदेव, वंडरचीफचे फाऊंडर अ‍ॅण्ड सीईओ रवी सक्सेना आणि मेटो ब्रँडचे सीईओ निसान जोसेफ यांचा समावेश आहे. या संमेलनाला जय हिंद कॉलेजचे प्राचार्य डॉ. विजय दाभोलकर आणि एआयसीटीई कोर्सेसच्या संचालिका डॉ. राखी शर्मा यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. कोअर टीममध्ये निकोले गुहा, निर आवास्कर, सोहम विभुते, सियान माकवाने, भूमिका डिंगरेजा, यशस्वी रावतानी, दिती खत्री, अबिगेल अल्बर्टो आणि नम्रता तलरेजा हे आहेत.