शस्त्रसंधीत अमेरिकेची भूमिका काय -जयराम रमेश

शस्त्रसंधीत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची नेमकी भूमिका काय? असे पहिल्यांदाच होत आहे जेव्हा त्रयस्थ देशाने दोन देशांच्या प्रकरणात नाक खुपसले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यावर काहीच का बोलत नाहीत, असा सवाल काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी आज पत्रकार परिषद घेऊन केला. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो म्हणतात की अमेरिकेची यात महत्वाची भूमिका होती, त्यांच्यामुळे युद्ध थांबले. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर याचे उत्तर का देत नाहीत, असा सवालही त्यांनी केला.