जयशंकर यांचे पाकिस्तानी संसद अध्यक्षांशी हस्तांदोलन

आशिया कप क्रिकेट सामन्यादरम्यान हिंदुस्थानी खेळाडूंनी पाकिस्तानी क्रिकेटपटूंशी हात मिळवण्यास नकार दिला होता. मात्र आज ढाका येथे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी पाकिस्तानी संसदेचे अध्यक्ष अयाज सादिक यांची भेट घेतली आणि हस्तांदोलनही केले. पहलगाम हल्ल्यानंतर हिंदुस्थानी लष्कराने ‘ऑपरेशन सिंदूर’ मोहीम राबविली आणि पाकडय़ांना धडा शिकविला. पाकिस्तानी दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले. तेव्हापासून दोन्ही देशांमध्ये तणाव वाढला आहे. आशिया कप क्रिकेट सामन्या दरम्यान टीम इंडियाने पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन करण्यास नकार दिला होता. एवढेच नाही तर आशिया कप जिंकल्यानंतर एसीसी प्रमुख मोहसीन नक्वी यांच्या हस्ते ट्रॉफी घेण्यास नकार दिला होता. नक्वी हे पाकिस्तान सरकारमध्ये मंत्री आहेत.