जालन्यातील अंबड तालुक्यातील मौजे लालवाडी शिवारातील ट्रक भरून बीडहुन जालन्यात येणारा गुटखा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतला. या ट्रकची झाडाझडती घेतली असता गोवा कंपनीचा 50 लाख 82 हजार रुपयांचा गुटखा व 20 लाख रुपये किंमतीचा ट्रक जप्त करण्यात आला.
महाराष्ट्र शासनाने राज्यात उत्पादन व विक्री साठी बंदी घातलेला गुटख्याने भरलेला ट्रक क्र. बीडकडुन जालन्याच्या दिशेने येणार असल्याची माहिती 12 ऑगस्ट रोजी रात्री स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांना त्यांचे गोपनिय बातमीदाराकडुन मिळाली. त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व अंमलदार यांचेसह अंबड तालुक्यातील मौजे लालवाडी शिवारातील जगदंबा राजस्थान हॉटेलसमोर जाऊन सदर ट्रक ताब्यात घेतले. ट्रक चालक राजेंद्र भानुदास चव्हाण रा. सु-याची वाडी ता. जि.बीड यास ट्रक मधील असलेल्या मालाबाबत विचारपुस केली असता त्याने सांगितले की, बीड येथुन सदरचा माल गुटख्याने भरलेले विविध पोते भरुन जालना येथे घेऊन जात आहे. तेव्हा पथकाने सदर ट्रकची पाहणी केली असता त्यामध्ये महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत असलेला गोवा कंपनीचा गुटखा किंमती 50 लाख 82 हजार रुपयेचा मिळुन आला पथकाने सदरचा गुटखा व 20 लाख रुपये किंमतीचे ट्रक वाहन असा एकुण 70 लाख 82 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल व अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव, सहायक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ, पोलीस अंमलदार लक्ष्मीकांत आढेप, गोपाल गोशीक, देवीदास भोजणे, सचिन राऊत, भागवत खरात, सोपान क्षीरसागर, कैलास चेके यांनी कारवाई केलेली आहे.