
जालना शहरातील चंदनझिरा येथील मातोश्रीनगर भागात एक 9 वर्षीय मुलगी रविवारी रात्री बेशुद्धावस्थेत आढळून आली होती. या मुलीला नातेवाईकांनी तातडीने चंदनझिरा पोलिसांच्या मदतीने जिल्हा महिला व बाल रुग्णालयात हलविले. सदर मुलीवर सामूहिक बलात्कार करून, तिला बेदम मारहाण करण्यात आल्याने ती बेशुद्ध पडली होती. स
दर मुलीची प्रकृती धोक्याबाहेर असून, तिला पुढील उपचारासाठी संभाजीनगर येथे हलविण्यात आले आहे. या घटनेमुळे जालना शहरात खळबळ उडाली असून, नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, पोलिसांनी याप्रकरणी पाच संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे. घटनेची माहिती कळताच पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी घटनास्थळी भेट दिली असून, सध्या ते चंदनझिरा पोलीस ठाण्यात तळ ठोकून आहेत.
या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी सोमवारी सकाळी 11 च्या सुमारास जालना-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर जोरदार निदर्शने करीत रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी संतप्त नागरीकांच्या वतीने पोलीस प्रशासना विरुध्द जोरदार घोषणाबाजी केली.