Jalna News – जालन्यात शिवसेनेचे भगवे वादळ…. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी इच्छूक उमेदवारांमध्ये प्रचंड उत्साह

शिवसेना जिंदाबाद… उध्दव ठाकरे साहेब तुम आगे बढो… अशा घोषणांनी परिसर दणाणला. नव्या जोशात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या इच्छुक उमेदवारांनी जालना जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी प्रचंड गर्दी केली होती. अर्ज वितरणास इच्छुक उमेदवारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शविला.

माजी आमदार संतोष सांबरे यांनी आयोजित केलेल्या बैठकीत जालना जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून इच्छुक उमेदवारांना मोठ्या उत्साहात अर्जाचे वाटप करण्यात आले. इच्छुक उमेदवारांनी अर्जासाठी मोठी गर्दी केली होती. संतोष सांबरे यांनी या प्रसंगी उपस्थित पदाधिकार्‍यांना आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी व्यवस्थित नियोजन करून, गाव पातळीवर घरा-घरात जाऊन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ध्येय धोरणे पोहोचवणे तसेच संघटनात्मक बांधणी करून निवडणुकीसाठी सर्व शिवसैनिकांनी सज्ज राहावे असे आवाहन केले.

यावेळी संतोष सांबरे यांच्या समवेत जिल्हासंघटक भानुदास घुगे, उपजिल्हाप्रमुख रमेशराव गव्हाड, पी. एन. यादव, भगवानराव कदम, उपजिल्हाप्रमुख मनीष श्रीवास्तव, परमेश्वर जगताप, माजी जिप. अध्यक्ष उत्तमराव वानखेडे, मुरलीधर शेजुळ, कैलास पुंगळे, जयप्रकाश चव्हाण, अशोक बरडे, कुंडलिक मुट्ठे, भरत सांबरे आदींची उपस्थिती होती. यावेळी बोलताना माजी आमदार संतोष सांबरे म्हणाले की, जालना जिल्हा हा सातत्याने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा असून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना अभिप्रेत असणारे शिवसैनिक या जिल्ह्यात आजही शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षासोबत आहेत. जालना जिल्हा हा कायमच शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला असून पक्षावर कितीही मोठी संकटे आली तरी जालना जिल्ह्यातील शिवसैनिक आजही आपल्या निष्ठेने पक्षाचे काम करत आहे. पक्षप्रमुखांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून येणार्‍या प्रत्येक निवडणूकित शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांचे विचार आणि पक्षाचे मशाल चिन्ह घराघरात, जनमानसात नेऊन पक्षाला नवी उभारी देण्यासाठी कटिबद्ध आहे. जालना जिल्हा परिषद ही सातत्याने शिवसेना पक्षाच्या ताब्यात राहिलेली असून आगामी जिल्हा परिषद निवडणूकित देखील शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जास्तीत जास्त सदस्य निवडणूक येतील आणि जालना जिल्हा परिषदेवर शिवसेनेचा भगवा फडकेल असा विश्वास संतोष सांबरे यांनी यावेळी व्यक्त केला.

यावेळी उपतालुकाप्रमुख संजय जाधव, कल्याण टकले, रामेश्वर फंड, अर्जुन ठोंबरे, देविदास जर्‍हाड, युवासेना उपजिल्हाप्रमुख कारभारी मसलेकर, विभागप्रमुख सिताराम धुळे, गजानन सानप, शैलेश दिवटे, परमेश्वर मात्रे, भरत मदन, काकासाहेब ढाकणे, जितेंद्र सपकाळ, अनिस पठाण, विठ्ठल शिंदे, ताराचंद जाधव, अण्णासाहेब बनसोडे, अंकुश वाघ, विष्णू गारखेडे, जनार्दन रेगुडे, विठ्ठल आदबने, बाबासाहेब जोशी, बाबासाहेब पाखरे, सुरज पाखरे, अंकुश जाधव, नागोराव मामा, ज्ञानेश्वर गोरे, विलास करतारे, कृष्णा खंडेकर, प्रकाश गावडे, समाधान काकडे, गणेश सवडे, बाबुराव सवडे, श्याम जाधव, नवनाथ खांडेभराड, संतोष चंदनशिवे, वैजनाथ ढोरकुले, मिलिंद साळवे, भरत उगले, पवन जोरे, समाधान चव्हाण,गजानन मुळे, विशाल झोरे, विष्णू अंभोरे, संजय दिघे, हरिश्चंद्र मस्के, शिवाजी मस्के, विष्णू मस्के,सोमनाथ घोडके, शंकर रगड, अशी पटेल, समाधान सवडे, सुभाष आरसूळ, श्रीमंत मस्के, बळीराम कोल्हे, फैजान मिर्झा, संजय मुरकुटे,रूपम घुगे, साक्षी गायकवाड, परमेश्वर पालोदे, कृष्णा जाधव, बबन मिसाळ, उमेश शिंदे, शंकरराव जावळे, संदीप जाधव, शिवाजी अंभोरे, उत्तमराव कोल्हापुरे, शंकर दाभाडे, नयन बोरुडे, श्याम राठोड, कृष्णा जाधव, रामदास डिक्कर, ज्ञानेश्वर गरबडे, प्रल्हाद डुबल, शंकर रगड, रमेश गायकवाड, शंकरराव जाधव, नारायण गिराम, तुळशीराम काळे, प्राजक्ता मूळे यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.