Jalna News – लॉजमधील कुंटणखान्यावर पोलिसांची धाड; चार महिलांची सुटका, हॉटेल मालकासह ८ ग्राहकांना पकडले

जालना शहरातील बस स्थानकाजवळ असलेल्या न्यू शिवगंगा लॉजवर अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्षाच्या पोलिसांनी छापा मारला आहे. या छाप्यामध्ये पोलिसांनी हॉटेल मालकासह आठ ग्राहकांना अटक केले असून चार महिलांची सुटका केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्षास न्यू शिवगंगा लॉज येथे लॉज मालक संदीप पांडुरंग राऊत हे स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी बाहेरुन महीलांना आणून त्यांच्याकडुन वेश्या व्यवसाय करीत असल्याची माहिती मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव पंकज जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्षाचे प्रभारी अधिकारी व स्टाफचे अंमलदारांनी छापा टाकला.

यावेळी न्यू शिवगंगा लॉजमध्ये आरोपी लॉज मालक संदीप पांडुरंग राऊत, मॅनेजर बाळासाहेब अंकुश जगताप, निखील शेषराव हिवाळेरा, राजु नाना गव्हाड, अनिल वामनराव हिवाळे, गणेश भाऊसाहेब ओळेकर, शिवाजी भाऊराव ओळेकर, अमोल जगन जंजाळ अशा आठ जण आणि ४ महीला लॉजमध्ये आढळून आल्या. पोलिसांनी आठही जणांना ताब्यात घेतले आणि चार महिलांची सुटका केली.

त्यांच्या ताब्यात रोख १ लाख १ हजार २७० असा मुद्देमाल मिळून आला आहे. त्यानुसार त्यांना ताब्यात घेवून त्यांच्याविरुध्द पोलीस ठाणे सदरबाजार येथे महिलांच्या अनैतिक व्यापारास प्रतिबंध अधिनियम १९५६ कलम ३, ४, ५, ६ प्रमाणे प्रभारी अधिकारी अ.मा.वा.प्र. कक्ष पोउपनि गणेश शिंदे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल, अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली अ.मा.वा.प्र. कक्षाचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक गणेश शिंदे, पोलीस उपनिरीक्षक रवी जोशी, पोहेकों. कृष्णा देठे, महिला अंमलदार संगिता चव्हाण, पुष्पा खरटमल, आरती साबळे, रेणुका राठोड व चालक पोलीस अंमलदार संजय कुलकर्णी यांनी केलेली आहे.