
बदनापूर तालुक्यातील ढोकसाळ येथे दोन भावांमध्ये वाद झाला. कोर्टाचे वॉरंट घेऊन आलेले पोलीस कर्मचारी जोनवाळ व सहकारी जारवाल यांनी गावातील काही विरोधी लोकांचे ऐकून वॉरंटधारक रामा गव्हाणे (रा. ढोकसाळ, ता. बदनापूर) यांना आरोपीच्या पत्नीसमोर अमानुषपणे मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने बदनापूर पोलिसांविषयी प्रचंड चीड निर्माण होत आहे.
पोलिसांनी लाथाबुक्क्याने मारहाण करीत असताना रामा गव्हाणे हा ओरडत, मला ओढू नका, मला शर्ट तरी घालू द्या, बिगारीचे काम करून उदरनिर्वाह करणाऱ्या आरोपीची पत्नी रडत पदर पसरत असताना लाथाबुक्क्याने मारहाण बीट अंमलदार जोनवाळ व सहकारी जारवाल यांनी केली.
अनेकदा वॉरंट देऊनही हा संशयित आरोपी न्यायालयात हजर झाला नसल्याने पोलीस त्याला घेण्यासाठी गेले होते. त्यावेळी लाथाबुक्क्यांनी त्यास मारहाण करण्यात आली. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाल्याने पोलीस दलाविषयी प्रचंड रोष निर्माण होत आहे. याप्रकरणी मल्हार सेनेमार्फत निवेदन देऊन आंदोलन करण्यात येणार असल्याचे मल्हार सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.




























































