Jammu Kashmir – पूंछमध्ये पाकिस्तानकडून युद्धबंदीचे उल्लंघन, लष्कराकडूनही गोळीबाराला चोख प्रत्युत्तर

जम्मू-कश्मीरमधील पूंछ जिल्ह्यात नियंत्रण रेषेवर मंगळवारी पाकिस्तानने युद्धबंदीचे उल्लंघन केले. जवळपास 10 ते 15 मिनिटे हा गोळीबार चालला. हिंदुस्थानी लष्करानेही या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिले. नियंत्रण रेषेवर दहशतवादी घुसखोरीचा प्रयत्न करत असल्याचे वृत्त असल्याने हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

सैन्याच्या 04-जेएके रायफलने केलेल्या दाव्यानुसार, पाकिस्तानी सैन्याच्या 801 मजहादीन पोस्ट, एलपी-1 ने युद्धबंदीचे उल्लंघन केले. 04-जेएके रायफलच्या सैन्य चौकीवर 12 ते 15 राउंड गोळीबार केला आहे. सैन्यानेही या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिले. ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानकडून हे पहिलेच युद्धबंदी उल्लंघन आहे.