
जपानच्या राजकारणात आज ऐतिहासिक क्षण घडला असून ६४ वर्षीय सनाए ताकाईची याची देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधानपदी निवड करण्यात आली आहे. जपानच्या संसदेने बहुमताने त्यांची निवड केली. लिबरल डेमोक्रॅटिक पार्टीने (एलडीपी) त्यांना आपला नेता म्हणून निवडाल होतं. त्या आता शिगेरू इशिबा यांची जागा घेतील. ज्यांनी निवडणुकीत पराभव झाल्यानंतर पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला होता.
कोण आहेत सनाए ताकाईची?
मिळालेल्या माहितीनुसार, सनाए ताकाईची या कट्टर राष्ट्रवादी आणि रूढीवादी विचारसरणीच्या नेत्या आहेत. त्या स्वतःला ‘जपानची आयर्न लेडी’ (Iron Lady) म्हणवतात आणि ब्रिटनच्या मार्गारेट थॅचर यांच्याकडून प्रेरणा घेतात.ताकाईची यांना कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही. त्यांनी पहिल्यांदा 1993 मध्ये निवडणूक लढवली आणि संसदेत पोहचल्या. त्या माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्या समर्थक असल्याचं बोललं जातं. ताकाईची यांनी आर्थिक सुरक्षा, अंतर्गत सुरक्षा आणि लैंगिक समानता यांसह विविध मुद्द्यांवर काम केलं आहे.