
आयसीसी टी-20 वर्ल्डकपच्या फायनलमध्ये वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह हिंदुस्थानसाठी हुकुमाचा एक्का ठरला. बुहराहने न्यूझीलंडच्या चार फलंदाजांना आपल्या जाळ्यात अडकवले. त्याने 4 षटकांमध्ये फक्त 15 धावा देऊन 4 विकेट्स घेतल्या. रचिन रवींद्र, मिचल सँटनर, जेम्स नीशम आणि मॅट हेन्री या चौघांना त्याने बाद केले, यापैकी तिघांना तर त्याने बोल्ड केले. या कामगिरीबद्दल त्याला प्लेयर ऑफ द मॅच पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
गेल्या काही वर्षांपासून जसप्रीत बुमराह हा हिंदुस्थानचे ट्रम्प कार्ड ठरत आहे. नवीन चेंडू असो किंवा मधल्या षटकांमध्ये एखादी जम बसवलेली जोडी फोडायची असो किंवा डेथ ओव्हर्समध्ये येऊन धावा वाचवणे असो बुमराह याने ही सगळी कामं चोखपणे पार पाडली आहेत. त्याचा लेझर गाईड यॉर्कर तर फलंदाजांसाठी कोडेच बनलेला असतो. मात्र यंदाच्या वर्ल्डकपमध्ये बुमराहने स्लोअर बॉलचाही मस्त वापर केला. मात्र बुमराहला हा स्लोअर वन कसा टाकायचा हे मी शिकवल्याचा दावा पाकिस्तानमध्ये जन्मलेल्या खेळाडूने केला आहे.
जसप्रीत बुमराह माझ्याकडून स्लोअर वन शिकण्याचा दावा पाकिस्तानात जन्मलेला आणि सध्या यूएईकडून क्रिकेट खेळणाऱ्या जहूर खान याने केला आहे. जहूरने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मुंबई इंडियन्ससोबतच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी त्याने जगातील सर्वोत्तम गोलंदाज जसप्रीत बुमराहने देखील त्याच्याकडून गोलंदाजीची टीप घेतल्याचा खुलासा केला. जहूर खान 2014 पासून मुंबई इंडियन्ससोबत नेट बॉलर म्हणून जोडला गेला होता. 2020 मध्ये जेव्हा आयपीएल युएईमध्ये खेळवण्यात आली तेव्हा त्याच्या गोलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधले. याच दरम्यान त्याने बुमराहला स्लोअर वन टाकण्याचे शिकवले होते.
2020 च्या आयपीएल दरम्यान यूएईमधील प्रचंड उष्णतेमुळे चेंडू पकडणे कठीण होत होते. मुंबई इंडियन्सच्या सराव सत्रात झहूरने जहूरने खास ग्रिपसह टाकलेला स्लोअर बॉल पाहून शेन बॉन्ड आणि महेला जयवर्धने थक्क झाले. बुमराहने जेव्हा झहूरची ही कला पहिली, तेव्हा त्याने स्वतःहून झहूरला ती ग्रिप शिकवण्याची विनंती केली. बुमराहने त्या ग्रिपचा सराव केला आणि त्याला ‘नेक्स्ट लेव्हल’ म्हटले. जगातील अव्वल गोलंदाज असूनही बुमराहने आपल्याकडून नवीन गोष्ट शिकण्याची तयारी दाखवली, हे खूप अभिमानास्पद होते, असे तो म्हणाला.
Zahoor Khan said –
“Jasprit Bumrah has learned his slower delivery variation from me back in 2019 when I played with him in Mumbai Indians.”
Perfect Quote – Success has many fathers, failure is an orphan pic.twitter.com/4VIf6EYpWM
— Ajay Jadeja (@AjayJadeja171) March 11, 2026
मी मुंबई इंडियन्ससोबत तीन महिने होतो. यादरम्यान रोहित शर्मा, हार्दिक पांड्या आणि जसप्रीत बुमराहसोबत बराच वेळ घालवला. बुमराहला माझी स्लोअर डिलिव्हरी इतकी आवडली की त्याने मला विचारले, ही स्लोअर बॉलची ग्रिप कशी धरतोस? जगातील नंबर वन गोलंदाजाने मला असा प्रश्न विचारणे, ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती, असे जहूर यावेळी म्हणाला. मी रोहित भाईला गोलंदाजी केली. माझा एक स्लोअर बॉल त्याच्याकडे इतक्या उशिरा पोहोचला की तो पाहतच राहिला. त्याला चेंडूचा वेगच समजला नाही. तो म्हणाला, जरी फलंदाजाने हा चेंडू ओळखला, तरी यावर षटकार मारणे अशक्य आहे, अशी आठवणही जहूरने सांगितली.


























































