
तेलंगणाचे माजी राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी आज महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची शपथ घेतली. लोकभवनातील दरबार हॉल येथे झालेल्या शपथविधी सोहळ्यात मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर यांनी जिष्णू देव वर्मा यांना राज्यपाल पदाची शपथ दिली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, महापौर रितू तावडे, पोलीस महासंचालक सदानंद दाते आदी मान्यवर उपस्थित होते. जिष्णू देव वर्मा हे महाराष्ट्राचे 22 वे राज्यपाल आहेत.



























































