
उरण इराण, अमेरिका आणि इस्त्रायल युद्धाचा जेएनपीए बंदराला मोठा फटका बसला आहे. युद्धामुळे १ मार्चपासून दररोज कंटेनर मालाची होणारी वाहतूक २३ हजारांवरून आता २० हजारांवर आली आहे. दररोज बंदरातून होणाऱ्या कंटेनर वाहतुकीची संख्या तीन हजारांनी घटल्याने वाहतूकदारांचे मोठे नुकसान होत आहे.
जेएनपीटी बंदरातून विशेषतः रमजानच्या काळात आखातात मोठ्या प्रमाणावर केळी, द्राक्षे आदी फळांची निर्यात केली जाते. तसेच कांदा, बासमती तांदळाचीही निर्यात केली जाते. मात्र १ मार्चपासून सुरू झालेल्या मध्य पूर्वेतील युद्धजन्य परिस्थितीची झळ आता येथील जेएनपीए बंदरालाही बसण्यास सुरुवात झाली आहे. जेएनपीए बंदरातून दररोज सरासरी २३ हजारांहून अधिक कंटेनर मालाची वाहतूक केली जाते. मात्र आखातात उद्भवलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे मालवाहतूक धोकादायक झाली आहे.



























































