रुटने विजय खेचून आणला अन् मालिकाही जिंकली

309 धावांचा पाठलाग करताना 133 धावांत अर्धा संघ बाद झाल्यानंतर ज्यो रुटने 139 चेंडूंत 166 धावांची झुंजार आणि दमदार खेळी करत इंग्लंडला दुसऱया सामन्यात 7 चेंडू आधीच 3 विकेट राखून थरारक विजय मिळवून दिला. या विजयासह इंग्लंडने 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी मिळवून दिली. रुटने विल जॅक्ससह (49) सहाव्या विकेटसाठी 143 धावांची भागी रचत इंग्लंडला विजयासमीप नेले आणि नंतर तळाच्या फलंदाजांच्या साथीने संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. तत्पूर्वी किसी कार्टी (103), ब्रॅण्डन किंग (59) आणि कर्णधार शाय होप (78) यांच्या खेळाच्या जोरावर विंडीजने सर्वबाद 308 अशी धावसंख्या उभारली होती.