
तत्काळ सुनावणी घेणे शक्य नसते. कारण न्यायपालिकेचे कामकाज ‘एआय’द्वारे चालत नाही तर मानवाकडून होत असते, असा तीव्र संताप उच्च न्यायालयाने व्यक्त केला.
एका याचिकेची तातडीने सुनावणी घेण्याची विनंती न्या. जितेंद्र जैन यांच्या एकल पीठाकडे करण्यात आली. आमच्या बाजूने निकाल लागेल असे चांगले मुद्दे आमच्याकडे आहेत. तेव्हा आमच्या याचिकेवर तत्काळ सुनावणी घ्यावी, अशी मागणी करण्यात आली.
यास न्यायालयाने नकार दिला. खटल्यांचा निपटारा जलदगतीने व्हावा यासाठी आम्ही प्रयत्नशील असतो. पण प्रलंबित प्रकरणांचा ढीग प्रचंड आहे. दैनंदिन कामाचा ताण असतो. अशा परिस्थितीत याचिका दाखल झाल्यावर त्यावर लगेचच अंतिम सुनावणी घेणे शक्य नाही, असे न्या. जैन यांनी नमूद केले.
30 वर्षांपासून प्रतीक्षा
अनेक याचिका गेल्या 30 वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. या याचिका बाजूला ठेवून तुमचे म्हणणे ऐकावे असा कोणताही खास मुद्दा तुमच्याकडे नाही, असे न्यायालयाने याचिकाकर्त्याला फटकारले.
कामगार, अपघात दाव्यांना प्राधान्य
कामगार कायद्याच्या शेकडो याचिका प्रलंबित आहेत. मोटार अपघात दाव्यांचा डोंगर न्यायपालिकेच्या समोर आहे. त्यांना आधी प्राधान्य द्यायला हवे, असेही न्या. जैन यांनी स्पष्ट केले.





























































